* आमच्याविषयी *

शाळेची वैशिष्टये

1) ही ख्रिश्चन अल्पसंख्याक शाळा असून ती कॅथलिक संस्थेने स्थापन केली आहे.

2) अल्पसंख्याक अधिकाराखाली चालविली जाते.

3) जरी ही शाळा मुख्यत्वेकरून कॅथलिक लोकांच्या शिक्षणाकरिता स्थापन करण्यास आली असली
    तरी विधर्मी विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. तसेच अन्य धर्मीय कर्मर्चायांचीही नेमणूक केली 
    जाते.

4) या शाळेत मुल्याधिष्ठित शिक्षण दिले जाते.

5) आमच्या शाळेत मराठी माध्यमाबरोबरच  Semi-English चे वर्ग देखील चालविले जातात.

6)  शालेय वास्तू भव्य असून परिसर रमणीय आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्वतोपरी कार्यरत असलेली आमची ही शाळा.
शालेय कामकाज सुरळितपणे¸यशस्वीरित्या पार पाडण्यास शाळेतील कर्तव्यदक्ष¸नियोजनबध्द¸
शिस्तप्रिय¸ कर्मनिष्ठ¸ अनुभवी मुख्याध्यापिका¸ शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी सेवेत राहून सदैव शाळेला यशोशिखरावर नेण्यास  प्रयत्‍नशील असतात.

विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शालेय सहभाग
-----------------------------------------

1) शिष्यवृत्ती - माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा.
2) राष्ट्रभाषा हिंदी - परिक्षा प्रारंभिक,प्रवेश परिचय .
3) N.T.S.E - राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा.
4) N.M.M.S - आर्थिकदृष्टया मागासवर्गीय.
5) चित्रकला - एलिमेंटरी, इंटरमिजीएट .