* शालेय इतिहास *

    ज्या पवित्र क्रूसावर प्रभू येशूने जगाच्या तारणासाठी व पापमुक्तीसाठी आपले जीवन समर्पित केले त्याच पवित्र क्रूसाने प्रेरित होऊन ‘होली क्रॉस संस्थेच्या’ संस्थापिका मदर क्लॉडिन एशेरनियरयांनी ही संस्था नावारूपाला आणली.    त्यांच्या सत्कार्याऩे, त्यागमयी, निःस्वार्थ नमुनेदार आचरणाने प्रेरित होऊन होली क्रॉस संस्थेच्या फ्रान्सहून आलेल्या सहा सिस्टर्स मदर वेरोनिक़ा. सि.जीऩ, सि.क्लेमेंटाइऩ, सि.फिलोमिऩा, सि.माऱी, सि.सुझान यांनी 25 सप्टेंबर 1886 साली भारत देशात महाराष्ट्र राज्यातील अमरावती शहरात पदार्पणकेले.त्यापैकी मदर वेरोनिका या सुपिरिअर होत्या.
त्यांच्या कारकीर्दित होली क्रॉस संस्थेच्या अनेक शाखा उघडल्या गेल्या.    वृध्दापकाळामुळे मदर सुपिरिअरचा भार मदर सेलीन डयूमोलिन यांच्यावर सोपविला.त्यांच्या लक्षात आले क़ी, कॅम्प परिसरात एकही मराठी शाळा नाही.त्यावेळी लोकांची शैक्षणिक निकड जाणून मराठी शाळा उघडणे गरजेचे वाटले. अर्थात़ , त्यांना मराठी भाषा येत नव्हती.परंतु खचून न जाता प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी प्रथम मराठी भाषा अवगत केली. त्यासाठी शिकवणीसुद्धा लावली.असाध्य ते साध्य | करिता सायास

कारण अभ्यास | तुका म्हणे

प्रभूवरील अढळ श्रध्दा , निष्काम सेवावृत्ती, समर्पित जीवन , गरिबांविषयीची तळमळ व प्रभू प्रेमाने भारावलेल्या या धर्मभगिनी सर्व संकटांना धैर्याने सार्मोया गेल्या.

कश्ती तुफानों से टकरायेगी

तभी किनारे पहुँच सकती है

या सर्व प्रयत्नांचे फळ म्हणून 1936 साली होली क्रॉस मराठी शालेयरूपी वटवृक्षाचे बीजारोपण केले.

इवलेसे रोप लवियले दारी

तयाचा वटवृक्ष भिडे गगनापरी

होली क्रॉस मराठी शाळेने 2011 ­- 2012 या वर्षी अमृत महोत्सव साजरा केला.

1) 1936 - शालेय बीजारोपण
2) 1950 - 15-6-1950 पूर्व माध्यमिक विभागास प्रारंभ (वर्ग 5वा सुरू )
3) 1962 - उच्च माध्यमिक विभागाची सुरवात (वर्ग 8वा सुरू )
4) प्रथम उच्च माध्यमिक बॅच (एच.एस.सी)