'
होलीक्रॉस मराठी
हायस्कूल ' म्हणजे महाराष्ट्रातील अमरावती या शहारातील एक नामांकित शाळा.
ही एक ख्रिश्चन अल्पसंख्याक शाळा म्हणून गणली जाते. ही शाळा 'दि अमरावती
क्रूसेलियन सोसायटी ,अमरावतीद्वारा
' संचलित आहे.
शाळेची वैशिष्टये
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्वतोपरी कार्यरत असलेली आमची ही शाळा.
शालेय कामकाज सुरळितपणे¸यशस्वीरित्या पार पाडण्यास शाळेतील कर्तव्यदक्ष¸ नियोजनबध्द¸
शिस्तप्रिय¸ कर्मनिष्ठ¸ अनुभवी मुख्याध्यापिका¸ शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी सेवेत राहून सदैव शाळेला यशोशिखरावर नेण्यास प्रयत्नशिल असतात.
|